Hot_NeWs
25 डिसेंबरला विक्रमसिंह पाटणकर यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस
खा. शरद पवार यांचेसह मान्यवरांची उपस्थिती
पाटण दि. 30 ( प्रतिनिधी ) राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री खा. शरद पवार व मान्यवरांच्या उपस्थितीत दि. 25 डिसेंबर रोजी येथील बाळासाहेब देसाई महाविद्यालयाच्या प्रांगणात घेण्यात येणार असल्याची माहिती विक्रमसिंह पाटणकर अमृतमहोत्सव सत्कार समितीचे अध्यक्ष तथा पंचायत समिती उपसभापती राजाभाऊ शेलार यांनी दिली.
अमृतमहोत्सव सत्कार समितीच्या वतीने प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत झालेल्या नियोजन बैठकीत ते बोलत होते. यावेळी जेष्ठ नेते तात्यासाहेब दिवशीकर, जिल्हा परिषद शिक्षण व अर्थ समिती सभापती राजेश पवार, पंचायत समिती सभापती सौ. उज्ज्वला जाधव,तालुका दूध संघाचे अध्यक्ष शंकरराव जाधव,निवासराव पाटील (तांबवे), पाटण अर्बन बँकेचे चेअरमन दिनकरराव घाडगे,खरेदी विक्री संघाचे चेअरमन अॅड. अविनाश जानुगडे, कोयना कृषकचे संस्थापक अध्यक्ष बाबुराव सुतार, शेती उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती दादासाहेब यादव आदींची प्रमुख उपस्थिती होती.
विक्रमसिंह पाटणकर यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त पाटण विधानसभा मतदारसंघात मोठय़ा प्रमाणावर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यात विविध संस्थाच्या वतीने महाआरोग्य शिबिरे, विविध क्रीडा स्पर्धा,रक्तदान शिबिरे, रूग्णांना फळे वाटप, गरीब विद्यार्थ्यांना शालेय व गरजूंना साहित्य वाटप व विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे संबंधितांनी यावेळी सांगितले.
बैठकीला जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सेवा सोसायटी आदींचे आजी, माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, व्यापा री, हितचिंतक बहुसंख्येने उपस्थित होते.

Comments
Post a Comment