Posts

Showing posts from November, 2018
Image
देसाई कारखान्याची गाळप क्षमता शंभर ग्रॅमने तरी वाढली का? युवा नेते सत्यजितसिंह पाटणकरांचा सवाल पाटण, दि. 1 : आ. शंभूराज देसाई तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देण्याऐवजी भलत्याच गोष्टी बोलू लागल्याने तुमची पक्षनिष्ठा व नेत्यांचा तुमच्यावरील विश्वास स्पष्ट झाला आहे. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांची येणाऱ्या निवडणुकीत मदत मिळावी म्हणूनच त्यांच्या नावाचा गजर करत आमच्यात मतभेद निर्माण करून स्वतःची पोळी भाजून घेण्याचा तुमचा प्रयत्न न ओळखायला तालुक्यातील जनता खुळी नाही. जर मतदारसंघात खरोखरच कोट्यावधीचा विकास केला हे छातीठोकपणे सांगता तर मग अशी सहानुभूती मिळविण्याची दयनीय वेळ तुमच्यावर का आली? पूरक प्रकल्प तर सोडाच पण अनेक वर्षे ताब्यात असलेल्या देसाई कारखान्याची गाळप क्षमता शंभर ग्रॅमने तरी वाढली का? असा सवाल युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी पत्रकाद्वारे लगावला. पत्रकात सत्यजितसिंह पाटणकर पुढे म्हणाले, तुम्ही खरोखरच एवढा मोठा विकास केला आहे तर मग येणाऱ्या निवडणुकीत मतदार तुम्हाला पुन्हा पाडतील अशी भिती का वाटते? याच भितीपोटी जाईल त्याठिकाणी आम्हा पिता-पु...
Image
निसर्गाचा खजिना "कोयना काठी हिल स्टेशन'ला पर्यटकांची पसंती पाटण (नितीन खैरमोडे), दि. 21 : सह्याद्रीच्या कुशीतून वाहणारी कोयनामाई नदी, शिवसागर जलाशय, चारीबाजूंनी डोंगररांगा, हिरवीगार झाडी, पक्षांचा किलबिलाट, पहाटेच्यावेळी जलाशयातील पाण्यावर उतरलेले ढग, पहाटेची गुलाबी थंडी अशा या निसर्गसौंदर्याने नटलेल्या आणि निसर्गाचे वरदान लाभलेल्या काठी गावच्या परिसरात पर्यटकांची रेलचेल वाढू लागली आहे. मुक्तहस्ताने उधळण केलेला येथील निसर्ग डोळ्यात साठवण्यासाठी पर्यटकांची पाऊले जमिनीवरील स्वर्ग अर्थातच काठी गावाकडे वळू लागली आहेत. पर्यटकांच्या मनाला विरंगुळा प्राप्त करून देणारा निसर्गाचा खजिना म्हणजेच कोयना "काठी हिल स्टेशन परिसर' होय. अशा या निसर्गसौंदर्याने नटलेल्या काठी परिसराला पर्यटकांनी भेट दिली नाही तर नवलच म्हणावे लागेल. हिमालय पर्वतासारखे पसरलेल्या काठी अवसरी येथील सह्याद्री पर्वताच्या रांगांमधून वाकडे-तिकडे साद  घालणारे कोयना धरण शिवसागर जलाशयातील अथांग पसरलेले पाणी. या  पाण्यात  सह्याद्री पर्वतावर  हिरवेगार  डोलणारे  कोयना  अभयारण्या...

Hot_NeWs

Image
25  डिसेंबरला विक्रमसिंह पाटणकर यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस खा. शरद पवार यांचेसह मान्यवरांची उपस्थिती पाटण दि.  30  (  प्रतिनिधी ) राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री खा. शरद पवार व मान्यवरांच्या उपस्थितीत दि.  25  डिसेंबर रोजी येथील बाळासाहेब देसाई महाविद्यालयाच्या प्रांगणात घेण्यात येणार असल्याची माहिती विक्रमसिंह पाटणकर अमृतमहोत्सव सत्कार समितीचे अध्यक्ष तथा पंचायत समिती उपसभापती राजाभाऊ शेलार यांनी दिली.        अमृतमहोत्सव सत्कार समितीच्या वतीने प्रमुख पदाधिकारी ,  कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत झालेल्या नियोजन बैठकीत ते बोलत होते. यावेळी   जेष्ठ नेते तात्यासाहेब दिवशीकर,  जिल्हा परिषद शिक्षण व अर्थ समिती सभापती राजेश पवार ,  पंचायत समिती सभापती सौ. उज्ज्वला जाधव , तालुका दूध संघाचे अध्यक्ष शंकरराव जाधव , निवासराव पाटील (तांबवे),   पाटण अर्बन बँकेचे चेअरमन दिनकरराव घाडगे , खरेदी विक्री ...