देसाई कारखान्याची गाळप क्षमता शंभर ग्रॅमने तरी वाढली का? युवा नेते सत्यजितसिंह पाटणकरांचा सवाल पाटण, दि. 1 : आ. शंभूराज देसाई तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देण्याऐवजी भलत्याच गोष्टी बोलू लागल्याने तुमची पक्षनिष्ठा व नेत्यांचा तुमच्यावरील विश्वास स्पष्ट झाला आहे. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांची येणाऱ्या निवडणुकीत मदत मिळावी म्हणूनच त्यांच्या नावाचा गजर करत आमच्यात मतभेद निर्माण करून स्वतःची पोळी भाजून घेण्याचा तुमचा प्रयत्न न ओळखायला तालुक्यातील जनता खुळी नाही. जर मतदारसंघात खरोखरच कोट्यावधीचा विकास केला हे छातीठोकपणे सांगता तर मग अशी सहानुभूती मिळविण्याची दयनीय वेळ तुमच्यावर का आली? पूरक प्रकल्प तर सोडाच पण अनेक वर्षे ताब्यात असलेल्या देसाई कारखान्याची गाळप क्षमता शंभर ग्रॅमने तरी वाढली का? असा सवाल युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी पत्रकाद्वारे लगावला. पत्रकात सत्यजितसिंह पाटणकर पुढे म्हणाले, तुम्ही खरोखरच एवढा मोठा विकास केला आहे तर मग येणाऱ्या निवडणुकीत मतदार तुम्हाला पुन्हा पाडतील अशी भिती का वाटते? याच भितीपोटी जाईल त्याठिकाणी आम्हा पिता-पु...